Devendra Fadnvis : राज ठाकरेंची भेट का घेतली? बंद दाराआड काय चर्चा झाली?; फडणवीस स्पष्टच बोलले

राज ठाकरेंच्या भेटीबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

विधानसभा निवडणुकीतील मतदानात घोळ झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष ठाकरेंनी केला होता. महायुतीच्या विजयावर त्यांच्याच लोकांचा विश्वास बसला नव्हता अशी टीकाही त्यांनी केली होती, त्यानतंर मनसे-महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले. मात्र दुसरीकडे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या दोन प्रमुख नेत्यांची सुमारे तासभर तरी बंद दाराआड चर्चा सुरू होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण त्यावर मनसे किंवा भाजप, यापैकी कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी मौन सोडले नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या भेटीचं गुपित विचारण्यात आलं असता, त्यांनी थेट उत्तर दिलं.

चर्चा फक्त तुम्ही करता, ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं , मी घरी येईन. त्यामुळेच आज मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांना भेटून गप्पा मारल्या, नाश्ता केला. आणि मग तिथून मी निघालो. आमच्या या भेटीचा किंवा बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

बातमी अपडेट होत आहे. 

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)