महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. महायुतीची मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्यात भाजपने महाविजयाकडे कूच केलं आहे. महाराष्ट्रात भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. आज मिळालेल्या यशाच श्रेय देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येतय. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. त्यांनी सलग तीन वेळा भाजपाला सर्वाधिक जागा जिंकवल्या आहेत. सलग 3 वेळा भाजपाला शंभरीपार नेलय. 2014 मध्ये 123 तेव्हा ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. 2019 मध्ये 105 आणि 2024 मध्ये हा आकडा मागच्या दोन निवडणुकांपेक्षा जास्त असू शकतो. आजवर असा पराक्रम करणं महाराष्ट्रातल्या कोणत्याच नेत्याला जमलेलं नाही.
देवेंद्र फडणवीस एक समर्पित कार्यकर्ता आहे. 2014 ला मुख्यमंत्री होते, पण, 2019 ला उद्धव ठाकरेंनी कपटाने मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. त्यांनी पक्षाला पुन्हा उभारी दिली. स्वत:तमधला एक आक्रमक विरोधी पक्षनेता महाराष्ट्राला दाखविला. पुन्हा समीकरणे जुळवून आणली. सरकार आणले. हे करताना केवळ पक्षाच्या आदेशावर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. पण, सरकारचे संपूर्ण दायित्त्व घेतलं.
त्या संधीच सोनं
लोकसभेतील दारुण पराभवानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील कार्यकर्ता खचला होता. त्यावेळी केंद्रीय नेतृत्त्वाने जागावाटप ते प्रचारयंत्रणा संपूर्ण अधिकार फडणवीसांना बहाल केले आणि या संधीचे त्यांनी आज सोने करुन दाखविले.
एकटे देवेंद्र फडणवीस टार्गेट
या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आणि त्यांच्या संपूर्ण इकोसिस्टीमने एकट्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते, पण, महाराष्ट्र कुणासोबत होता, हे आजच्या निकालांनी दाखवून दिले.
इन्फ्रामॅन म्हणून असलेली ओळख
संयमी आणि कणखर नेतृत्त्व: शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी सातत्याने टीका केली. पण, त्यांनी कायमच संयमाने उत्तर दिले आणि कधीही तोल ढळू दिला नाही. ही टीका अगदी कुटुंबापर्यंत गेली होती.तरुणाईमध्ये असलेली इन्फ्रामॅन म्हणून असलेली ओळख आणि त्यातून महाराष्ट्राला कशात अधिक रुची आहे, हे या निकालांनी दाखवून दिले.