नागपूरमध्ये सोमवारी मोठा हिंसाचार झाला, जमावाने आक्रमक होत दगडफेक केली, तोडफोड केली, पेट्रोल बॉम्बही फेकले. यात कोट्यवधींचे नुकसान झाले. या हिसांचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले, वरिष्ठ पोलीस आयुक्तांशी बैठक घेत त्यांनी सर्व आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधाताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार. कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
नागपूरमध्ये जी घटना झाली, त्याचा संपूर्ण आढावा नागपूरचे पोलीस आयुक्त, एसपी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मी घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्यासंदर्भातील हा आढावा होता. मुळातच काही गोष्टी मी सभागृहात यासंदर्भातील स्पष्ट केल्या होत्या.औरंगजेबाची कबर सकाळी जाळण्यात आली , त्यानंतर काही लोकांनी केलेली तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली. मात्र या ठिकाणी कबर जाळत असताना, कुराणच्या आयत लिहीलेली चादर जाळली, अशा प्रकारचा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला, त्यानंतर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात आलेल्या जमावाने तोडफोड, दगडफेक केली. गाड्या फोडल्या.
नागपूर राड्याप्रकरणी आत्तापर्यंत 104 आरोपींची ओळख पटली, त्यापैकी 92 लोकांना अटक केली. आरोपींमध्ये काही अल्पवयीन आहेत. दंगा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई होणार. सोशल मीडियावर हिंसा घडवणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांना सहआरोपी करणार.नुकसानग्रस्तांना 3ते 4 दिवसांत भरपाई मिळणार, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
बातमी अपडेट होत आहे.