अजित पवार, नेते, राष्ट्रवादीImage Credit source: ANI
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. असं असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तब्बल दोन दिवस राजधानी दिल्लीत होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत होते. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांना भेटण्यासाठी अजित पवार दिल्ली गेले होते. दोन दिवस दिल्लीत मुक्काम केल्यानंतरही अजित पवार आणि अमित शाह यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे अखेर अजित पवारांना परत मुंबईकडे फिरावं लागलं आहे.
अजित पवार मुंबईकडे रवाना
दोन दिवस थांबूनही अजित पवार आणि अमित शहा यांची भेट नाही. आज सकाळी अजित पवार पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. सोमवारी रात्रीपासून अजित पवार यांचा दिल्लीत तळ होता. जादा मंत्रिपदांसाठी आणि इतर चर्चा करण्यासाठी अजित पवार अमित शाह यांना भेटणार होते. शपथविधी तोंडावर असतानाच शाह यांची भेट न घेता अजित पवार मुंबईला रवाना झाले आहेत.