राज्यात मागील काही वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी २०२३मध्ये सर्वाधिक १९ हजार २९ रुग्ण आढळून आले आहे. मात्र, पूर्वीच्या आता तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. डेंगीच्या रुग्णांचे योग्य निदान व्हावे म्हणून राज्यात ४३ ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. पूर्वी ऑगस्ट, सप्टेंबर नंतर रुग्णसंख्या वाढ होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वर्षभर रुग्ण आढळून येत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. पुणे शहरात यंदा एक जानेवारी ते चार मे या कालावधीत डेंगीच्या २९० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यातील डेंगी संसर्गाची स्थिती
– वर्ष – तपासलेले नमुने – रुग्ण – मृत्यू
– २०२० : ४५०२६ : ३३५६ : १०
– २०२१ : ११०७६२ : १२७२० : ४२
– २०२२ : ८५९६१ : ८५७८ : २७
– २०२३ : १३४१०५ : १९०२९ : २१
– २०२४ : १८८३४ : १७५५ : ०
(७ मे पर्यंत )
राज्यात सर्वाधिक रुग्ण
आढळून आलेले जिल्हे
– जिल्हे – रुग्ण २०२३ – २०२४ (७ मे पर्यंत )
– बृहन्ममुंबई : ३३५ : २८५
– पालघर : ११२ : १७४
– नाशिक : ८८ : ७९
– कोल्हापूर : ६९ : ११७
– मिरज-सांगली : ७२ : ४१
डेंगी हा आजार नागरिकांच्या सहकार्याशिवाय रोखता येणे शक्य नाही. डेंगी नियंत्रणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. जनजागृती व्हावी आणि नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी जुलै महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
– डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आरोग्य सेवा