दीपक मानकर यांच्या संपर्कात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काही नेते असल्याची माहिती समोर आल्यानंतर मानकर यांनी आपण अजितदादा यांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनी आपल्याला कितीही मोठी संधी दिली तरी अजित पवार यांची साथ आपण सोडणार नसल्याच दीपक मानकर म्हणाले आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये मी अजित पवार यांच्याकडे संधी मागितली होती, मात्र ती संधी मला दिली नाही. गेले 30 ते 40 वर्ष मी राजकीय क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे मला संधी मिळावी अशी मागणी मी केली होती.मात्र ती संधी मला मिळाली नाही, पण त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा नाराज नाही आणि मी अजित पवार यांच्यासोबत मरेपर्यंत राहणार असं दीपक मानकर म्हणाले आहेत.
दरम्यान,काही दिवसांपूर्वी अजित गव्हाणे मला भेटले होते आणि त्यांनी आपल्याला भोसरी विधानसभेची निवडणूक लढवायची इच्छा बोलून दाखवली होती.भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीत निवडणूक लढवायची असेल तर आम्हाला संधी मिळणार नाही. म्हणूनच आम्ही शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याच गव्हाणे मला म्हणाले होते.त्यावेळेस तुम्ही विचार करून निर्णय घ्या असं मी त्यांना सुचवलं होतं. पण महेश लांडगे यांच्या विरोधात आपल्याला निवडणूक लढवायचीच आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले होते त्यानुसारच आज त्यांचा प्रवेश झालेला आहे.
अजित गव्हाणे यांच्यासोबत प्रवेश केलेल्या केलेल्यांची नावे
1. माजी महापौर हणमंतरावजी भोसले
2. माजी महापौर वैशालीताई घोडेकर
3. माजी नगरसेवक पंकज भालेकर
4. माजी नगरसेवक प्रवीण भालेकर
5. माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे
6. दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे
7. दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने
8. माजी नगरसेवक संजय नेवाळे
9. माजी नगरसेवक वसंत बोराटे
10. माजी नगरसेवक विजया तापकीर
11. शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा विरोधी पक्षनेते राहुल भोसले
12. माजी नगरसेवक समीर मासुळकर
13. माजी नगरसेवक गीता मंचरकर
14. माजी नगरसेवक संजय वाबळे
15. माजी नगरसेविका वैशालीताई उबाळे
16. शुभांगी ताई बोराडे
17. विनया ताई तापकीर
18. माजी नगरसेविका अनुराधा गोफने
19. माजी नगरसेवक घनश्याम खेडेकर
20. युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे
21. शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे
22. माजी नगरसेवक तानाजी खाडे
23. माजी नगरसेवक शशिकीरण गवळी
24. विशाल आहेर
25. युवराज पवार कामगार आघाडी
26. विशाल आहेर सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा
27. नंदूतात्या शिंदे
28. शरद भालेकर