Maharashtra DCM Swearing-in Ceremony: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याचा विक्रम केला. त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पिंक जॅकेट घातला होता. तसेच मी शपथ घेतो ऐवजी त्यांनी ‘गांभीपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ या शब्दाचा वापर करत वेगळपणा सिद्ध केला.
अजित पवार यांनी शपथविधीला सुरुवात करताना म्हटले, ‘मीअजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ या शपथविधी समारंभाला त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रचार दरम्यान वापरलेला गुलाबी जॅकट वापरला होता.