राहुल कुल, रमेश थोरातImage Credit source: Facebook
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या निकालाकडे जिल्ह्याचं लक्ष आहे. दौंडमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दौंडमध्ये भाजपचे उमेदवार राहुल कुल आघाडीवर आहेत. 7 हजार 729 मतांनी राहुल कुल आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रमेश थोरात पिछाडीवर आहेत. दौंड तालुक्यात यंदा अटीतटी लढत झाली. राहुल कुल यांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी रमेश थोरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यंदाची ही लढत अत्यंत अटीतटीची झाली.