CSMT स्टेशनला शिरताना पनवेल लोकलचा डबा घसरला, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीच्या दिशेने जाणारी हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेलहून आलेल्या लोकलचा डबा सीएसएमटी रेल्वे स्थानकात शिरताना रुळावरुन घसरला. त्यामुळे जवळपास तासाभरापासून हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद आहे. सध्या हार्बरवरील वडाळा ते सीएसएमटी मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिरणाऱ्या पनवेल-सीएसएमटी लोकलचा डबा सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर शिरताना घसरला. यावेळी लोकलचा वेग ताशी १५ किमी इतका असल्यामुळे सुदैवाने या अपघात कुठल्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
शिल्लक सेनेच्या प्रमुखांनी बाळासाहेबांचे विचार विकले, श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोलRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या मस्जिद बंदर स्थानकापर्यंत आणल्या जातील. हार्बर मार्गावरील सेवा वडाळ्यापासून आणि वडाळ्यापर्यंत सुरू राहतील. लोकल वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे काम वेगात सुरू आहे.

विंडो सीट पकडली, ठाकरेंचा बोईसर ते वांद्रे लोकलनं प्रवास

मुख्य मार्गावरील सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही वेळातच पूर्ववत होईल, अशी हमी रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.