Couples Split Up : मुलं झाल्यावरच नवरा-बायको एकमेकांपासून का होतात दूर? ती गोष्ट…

नात्यातील दुरावा असा दूर कराImage Credit source: गुगल

Couple relationship changes after having a baby : साखरपूडा झाल्यानंतर भावी पती-पत्नी गुलुगुलू बोलतात. रात्रभऱ त्यांच्या गप्पांची मैफल सजलेली असते. चॅटिंग, व्हिडिओ कॉल, भेटीगाठी हे प्रकरण लग्नानंतरही अनेक दिवस सुरू राहते. पण नात्यातील हा गोडवा नव्या नवरीचे नऊ दिवस या प्रमाणे नंतर हरवतो. धावपळीचे जीवन, नोकरीची कसरत यामुळे पुरूषाची घरातील अलिप्तता जाणवते. नात्यात दुरावा येतो. पत्नीला वाटते पती समजून घेत नाही तर नवऱ्याला नेमका असाच समज असतो. त्यात मुल झाल्यावर तर हा दुरावा जणू अधिक वाढतो. नात्यातील गोडवा हरवण्यामागील कारण तुम्ही मोजाल पण ही उत्तर तुमच्याकडे आहेत का?

ये दिल मांगे रोमान्स

नाते टिकवायचे असेल तर दोघांनी एकमेकांचा सहवास कमी होता कामा नये, याची खबरदारी घ्यावी. दिवसभर कचाकच भांडल्यावरही जर दोघे बेडवर गप्प असतील तर मग नात्यात दुरावा वाढतो. प्रेमाचा एक मार्ग शयन कक्षातून जातो असे म्हणतात ते उगीच नाही. तेव्हा नात्याला एकमेकांच्या ओढीची गरज असते हे विसरू नका.

मुलं झाल्यावर महिलांचे दुर्लक्ष

मुलं झाल्यावर अनेक महिला पतीकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वेळ देत नाही. एकतर त्या बालसंगोपन, आई होण्याचा आनंद यातच दंग असतात. मुलेचा लाड, त्याच्या बाल लिलांमध्ये तिचा वेळ जातो. दुसरं अजून एक वैज्ञानिक कारण आहे. आई जेव्हा बाळाला दूध पाजते तेव्हा ऑक्सीटोसिन नावाचे एक हार्मोन तयार होते. त्यामुळे आईचा ओढा, प्रेम, सुख हे मुलंच होऊन जाते. तिला पतीचे आकर्षण कमी होते. त्याच्याकडे दुर्लक्ष होते. दोघांमध्ये बऱ्याच दिवस शारीरिक संबंध ठेवता येत नसल्याने सुद्धा महिला पतीला नंतर वेळ देत नाही. त्यामुळे हे कारण ओळखून सामंजस्याने प्रेम वाढवा.

मुलांची जबाबदारी घ्या

आई मुलांना जन्म देते. त्यांचे संगोपन करते. अनेकदा आईलाच बाळाचं सर्व काही करावं लागते. महिलांच्या आयुष्यात मुलांची जबाबदारी कायम असते. अनेकदा इतर काहीच करता येत नसल्याने महिला निराश होतात. अशावेळी पुरुषांनी पत्नीला साथ देणे गरजेचे आहे. तिची झोप व्हावी यासाठी मुलांना सांभाळणे गरजेचे आहे.

एकमेकांना द्या वेळ

दोघांनी एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे. दोघांचे आवडीचे विषय माहिती करून त्यावर गप्पा मारणे, जेवताना हास्यविनोद करणे. एकमेकांच्या आवडीनिवडीनुसार पेहराव करणे, एकमेकांचे कौतुक करणे आवश्यक आहे. गोष्टी शेअर करा. पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करा.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)