नागपूर हे निसर्गाचे वरदार असणारे टुमदार शहर काल सुर्यास्तानंतर दगडफेक आणि जेसीबी वाहनांच्या धुराने अचानक वेढले. दोन्ही बाजूंनी जमावाने घोषणाबाजी सुरु केली आणि विटांचा जीवघेणा मारा सुरु झाला. पोलिसांना टार्गेटकरुन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीसहून अधिक पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याला पार्श्वभूमी होती ते काल सोमवारी निघालेल्या औरंगजेबा कबर हटविण्याचा मागणी करणाऱ्या मोर्चाची…नागपूराचा महाल परिसरात गल्ली बोळातून आणि इमारतीच्या गच्चीवरुन दगड एखाद्या बॉम्बगोळ्या प्रमाणे अंगावर पडत होते आणि पाहाता पाहाता दगड विटांनी रस्ता भरला..या अचानक झालेल्या हल्ल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तर पोलिसांची सावधानता कुठेतरी कमी पडल्याचेही जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागपूरातील महाल परिसरातील दोन गटात कालच्या मोर्चानंतर अफवा पसरुन दोन गटात तुंबळ राडा झाला. या हल्ल्यात घटनास्थळी मदतीसाठी धावलेले पोलीस कर्मचारी लक्ष्य ठरले. अंगावर अचानक दगडांचा मारा झाल्याने अनेक पोलीस रक्तबंबाळ झाले. या हल्ल्यात कुऱ्हाडीचा घाव हातावर झेलूनही डीसीपी निकेतन कदम यांनी आपल्या टीमला रेक्स्यु केले. त्यांच्या धाडसाचे कौतूक होत आहे. नागपूर पोलिसांनी एकत्र येऊन काल कायदा आणि सुव्यवस्था राखली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली विचारपूस केल्याने पोलिसांची धैर्य आणखी वाढल्याचे डीसीपी कदम यांनी सांगितले. आमच्याकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज आहेत.त्याच्याआधारे आम्ही समाजकंटकांना शोधून काढू असे डीसीपी निकेतन कदम यांनी सांगितले.
कालच्या घटनेत मला सुरुवातीला दगडांमुळे पायाला जखम झाली. मात्र परिस्थिती बिकट असल्याने माझे जखमेकडे लक्ष नव्हते. परंतू जेव्हा आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळविल्यानंतर थोड्या वेळाने मला झालेल्या जखमेतून वेदना होऊ लागल्याचे पोलिस उपायुक्त अर्चित चांडक म्हणाले. आपल्याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर शस्रक्रियेची काहीही गरज नसल्याचे म्हटलेय.. मात्र डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितल्याचेही त्यांनी सांगितले.
परिस्थिती आता संपूर्णपणे नियंत्रणात
हा हल्ला ठरवून केलेला असू शकतो. शक्यता नाकारता येत नाही. त्याठिकाणी एक बांधकाम सुरु होते.त्याच्या ठिकाणच्या सिमेंटच्या विटा हल्लेखोरांनी पोलिसांवर फेकल्या. त्यांचा आकार मोठा असल्यामुळे हे दगड वेगाने अंगावर येत होते. त्यामुळे आपल्या पायाला जखम झाल्याचे पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी सांगितले. सर्वांना हेच आव्हान आहे की त्यांनी शांतता ठेवावी आणि पोलिसांना सहकार्य करावे. मुख्यमंत्री साहेब पोलिसांच्या बाजूने आणि सोबत नेहमी राहतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही खाकी वर्दी घातलेली असल्याने आमचे कर्तव्य कायदा सुव्यवस्थे राखणे हे आहे. मुख्यमंत्र्यांचे कदम यांच्याशी मोबाईलवरुन बोलणे झाले असल्याचे नागपूरचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी सांगितले.