कोल्ड की हॉट? तुमच्या आरोग्यासाठी कोणती कॉफी चांगली

कॉफी हे जगभरात सर्वाधिक पसंत केलं जाणारं पेय आहे, अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात ही गरमा-गरम कॉफीने करतात. तर काही लोकांना या उलट कोल्ड कॉफी आवडते. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की तुमच्या शरीरासाठी कोणती कॉफी फायदेशीर आहे? कोल्ड कॉफी की हॉट कॉफी? कॉफीच्या या दोन्ही प्रकारांमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू सारखीच आहे का? कोणत्या कॉफीचा शरीरावर पॉझिटिव्ह परिणाम होतो? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

कॉफीमध्ये कॅफीन, अँन्टीऑक्सीडेंट्स आणि इतर काही पोषक तत्त्व असतात. कॉफी पिल्यामुळे तुमच्या शरीरात काही काळासाठी ऊर्जा निर्माण होते. याशिवाय तुम्हाला कॉफीच्या सेवनामुळे इतर देखील काही फायदे मिळतात. मात्र तुम्ही कोणत्या प्रकारची कॉफी पिता गरम की थंड यावर तुमच्या शरीरावर कॉफीचा काय परिणाम होतो? हे अवलंबून असतं.

हॉट कॉफीचे फायदे

गरज कॉफी पिल्याचे अनेक फायदे आहेत, थंडीच्या दिवसांमध्ये गरम कॉफी जास्त प्रमाणात पिली जाते. गरम कॉफी पिल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता वाढले आणि तुम्हाला थंडीपासून संरक्षण मिळते. सोबतच गरम कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात अँन्टीऑक्सीडेंट्स असतात ज्याचा उपयोग तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो. हॉट कॉफीमध्ये असलेलं कॅफीन तुमच्या ब्रेनसाठी देखील चांगलं असतं. ज्यामुळे तुमच्या ब्रेनचं फंक्शन अधिक वेगवान होतं. तुमचा मूड स्थिर राहण्यास मदत होते. हॉट कॉफीमुळे तुमची पचनशक्ती देखील वाढते.

कोल्ड कॉफीचे फायदे

कोल्ड कॉफीबाबत बोलायचं झाल्यास कोल्ड कॉफीचे देखील अनेक फायदे आहेत. कोल्ड कॉफीला लोक उन्हाळ्याच्या दिवसात पिणं पसंत करतात. कोल्ड कॉफीमुळे तुमच्या शरीरातील हीट कमी होऊन तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आराम मिळतो. कॅफीनचं प्रमाण जेवढं हॉट कॉफीमध्ये असतं तेवढंच ते कोल्ड कॉफीमध्ये देखील असतं.कोल्ड कॉफीमुळे तुमच्या शरीरातील अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते. तसेच डिहायड्रेशनची समस्या देखील दूर होते. सोबतच तुमच्या शरीराला ऊर्ज पुरवण्याचं काम देखील करते. कोल्ड कॉफीच्या सेवनामुळे तुमचं वजन देखील कमी होतं.

कोणती कॉफी फायद्याची

तसं पाहिलं तर दोन्ही प्रकारच्या कॉफीचे फायदे-तोटे सारखेच आहेत. मात्र तुम्हाला कोणती कॉफी आवडते? तुमच्या शरीराला कोणती कॉफी सूट होते, त्यावर त्याचा फायदा अवलंबून आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)