Maharashtra Election Results 2024: 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुतीला बहुमत मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 2019 मध्ये ‘नव महाराष्ट्रासाठी मी पुन्हा येईल…’ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. सध्याच्या कलानुसार महायुती 216 जागांवर आघाडीवर आहे. यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप १२८ जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात भाजप महायुतीची त्सुनामी पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्यांदा भाजप मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला महाराष्ट्राच्या इतिहासातलं मोठं बहुमत मिळालं आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर भाजपला भरभरुन मत दिल्यामुळे लाडक्या बहिणींचे देखील आभार मानले आहेत.
महायुतीच्या विजयाचे शिल्पकार
one and only one …..
राज्यातील लाडक्या बहीणींचा लाडका भाऊ…..देवाभाऊ देवाभाऊ 👍👍👍@Dev_Fadnavis @cbawankule @byadavbjp @ShelarAshish pic.twitter.com/NxgMjLvTVG— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 23, 2024
चित्रा वाघ यांनी एक्सवर (ट्विटर) देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये फडणवीस पेढा खाताना दिसत आहे… फोटो पोस्ट करत चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘महायुतीच्या विजयाचे शिल्पकार असा केला आहे. एवढंच नाही तर, ‘one and only one…, राज्यातील लाडक्या बहीणींचा लाडका भाऊ…..देवाभाऊ देवाभाऊ’ असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
जय हो ऽऽऽऽऽ विजय हो ऽऽऽऽऽ@Dev_Fadnavis pic.twitter.com/hEBIoCx2RX
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 23, 2024
शिवछत्रपतींचा आशीर्वाद…
चित्रा वाघ यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद… मोदीजींच्या सदिच्छा…देवेंद्रजींच्या पाठीशी… महाराष्ट्राच्या शुभेच्छा….!!’ अशी एक पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे.
देवेंद्र जी ….देवेंद्रजी आणि देवेंद्र जी…👍👍
चप्पा चप्पा भाजपा….
माझ्या राज्यातील सगळ्या लाडक्या बहीणीचें आभार…आभार ..आभार 👍👍👍
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 23, 2024
एवढंच नाहीतर, चित्रा वाघ यांनी लाडक्या बहिणींचे देखील आभार मानले आहेत. ‘देवेंद्र जी ….देवेंद्रजी आणि देवेंद्र जी… चप्पा चप्पा भाजपा…. माझ्या राज्यातील सगळ्या लाडक्या बहीणीचें आभार…आभार ..आभार’ अशी पोस्ट देखील चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर केली आहे.