आपल्या सर्वांना माहित आहे की लहान मुलांचे हृदय खुप कोमल असते. अशावेळी मस्करीतही आपण मुलांना अशा गोष्टी बोलू नयेत ज्याचा त्यांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. बऱ्याचदा घरातील अनेक वडीलधारी माणसे मुलांना गमतीने अशा गोष्टी बोलतात, जी मुले कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे पालकांच्या बोलण्याचं त्यांना वाईट वाटतं. अशातच बरेच पालक याकडे लक्ष देत नाहीत. पण नंतर ते मुलांसाठी खूप धोकादायक ठरते. मुले तुम्हाला बोलताना पाहतात आणि ते स्वतःही त्याची नक्कल करतात. अशा परिस्थितीत मुलांसमोर खूप विचारपूर्वक बोलावे. म्हणून, मुलांशी बोलताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगत आहोत ज्या मुलांना मस्करीतही बोलू नयेत. ज्याचा त्यांच्या मनावर हृदयावर आणि मनावर वाईट परिणाम होईल.
1. तू खूप मूर्ख आहेस.
मुलं एखाद्या गोष्टीमध्ये चुकले तर आपल्यापैकी अनेक पालक मुलांना तू खूप मूर्ख आहेस असे बोलून मोकळे होतात. पण अशा गोष्टींमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्यांना असे वाटते की ते काहीही करू शकत नाहीत. कारण मुलांच्या कोवळ्या मनावर यांचा विपरीत परिणाम होतो. त्याऐवजी तुम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ शकता आणि त्यांच्या चुका सुधारण्यास मदत करू शकता. पण अशा गोष्टी मुलांना कधीही बोलू नयेत.
२. तुम्ही कधीही काहीच करू शकणार नाही.
मुलांमध्ये उर्जेची पातळी खुप जास्त असते. त्यामुळे कधी-कधी मुल वयाच्या पलीकडे जाऊन काम करू लागतात. त्यामुळे बरेच पालक गंमतीने त्यांच्या मुलांना सांगतात की तु कधीही काहीच करू शकणार नाही. पण अशा गोष्टी मुलांच्या मनात नकारात्मकता निर्माण करू शकतात आणि त्यांना असे वाटते की ते कधीच काही साध्य करू शकत नाहीत. त्याऐवजी तुम्ही त्यांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यास प्रोत्साहित करू करत राहावे.
३. इतर लोकांची मुले तुमच्यापेक्षा चांगली आहेत.
जेव्हा अनेक पालक हे त्यांच्या मुलांची तुलना इतरांच्या मुलांशी करता तेव्हा तुमच्या मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच त्यांच्या मनात हीन भावना निर्माण होते. ज्या मुलाशी आपण त्याची तुलना करतो त्याच्यावर तुमची मुलं राग-राग करू लागतात. अशा परिस्थितीत अशा गोष्टी त्यांचे मनोबल तोडतात. त्याऐवजी तुम्ही नेहमी असे म्हणावे की तुम्ही इतरांपेक्षा खूप चांगले करू शकता. जेव्हा तुम्ही मुलांना काहीतरी चांगले करण्यास प्रेरित करता तेव्हा त्यांना खूप सकारात्मक वाटते.
४. तुमच्यासारखी मुले कधीच यशस्वी होत नाहीत
तुम्ही कितीही रागवला असाल, चिडला असाल मात्र कधीच तुमच्या मुलांना असे सांगू नका की, तुमच्यासारखी मुले कधीच यशस्वी होत नाहीत. ही वाक्ये मुलांना आतून मनावर घात केल्यासारखे तोडतात. अशा परिस्थितीत चुकूनही मुलांना अशा गोष्टी बोलू नयेत हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या मुलांच्या हृदयात आणि मनात कायत राहतात. यामुळे मुले ही न्यूनगंडाचे बळी ठरतात.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)