छगन भुजबळ यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी खलबतं, दरेकर यांची सूचक प्रतिक्रिया; काय घडतंय? 10 मुद्द्यात समजून घ्या

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

छगन भुजबळ सकाळी १० च्या सुमारास सागर बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. काल छगन भुजबळांनी ओबीसी संघटनांसोबत एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ओबीसी संघटनेतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. यानंतर आज ते सकाळी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. गेल्या अर्धा तासांपासून छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होत आहे. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे, याबद्दल मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र अचानक होणारी ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.

छगन भुजबळांचे देवेंद्र फडणवीसांशी खलबतं

  • गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
  • गेल्या अर्धा तासापासून छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर
  • छगन भुजबळ आज देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला जाणार असल्याची अजित पवार गटाच्या नेत्यांना कल्पना नव्हती.
  • भुजबळांची राजकीय पार्श्वभूमी पाहता बंडाचा निर्णय घेऊ शकतात, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
  • काल छगन भुजबळांची ओबीसी संघटनांसोबत बैठक पार पडली.
  • ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत छगन भुजबळांनी काल चर्चा केली.
  • मंत्रिपद न दिल्याने छगन भुजबळांनी याआधीच नाराजी व्यक्त केली होती.
  • नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोजून भुजबळ नाशिकमध्ये परतले होते.
  • यानंतर भुजबळांनी बैठका घेत वारंवार आपली नाराजी बोलून दाखवली होती.
  • यादरम्यान छगन भुजबळांनी “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य केले होते.
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)