छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादीImage Credit source: Facebook
येत्या पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या नव्या सरकारमध्ये कुणा-कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशातच अनुभवी नेत्यांवर पुन्हा मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील नव्या सरकारमध्ये मंत्री असतील, अशी चर्चा होत आहे. आघाडी सरकार आणि महायुती सरकारमधील मंत्रिपदाचा अनुभव भुजबळांच्या गाठीशी आहे. यावर स्वत: भुजबळांनी मिश्किल टिपण्णी केली आहे.