बारामती काबीज करायची आहे, आपल्याला पवारांचा प्रभाव करायचा आहे. हे ध्येय ठेवून अजित पवार यांना सत्तेत सामील करून बारामतीत पवारांच्या घरातलाच उमेदवार दिला. अपेक्षा होती की काही जागा अजित पवारांच्या पक्षातील उमेदवार निवडणून देतील परंतु वास्तविकता वेगळी झाली, अजित पवारांना दिलेल्या चार पैकी फक्त एक जागा निवडणून अली आणि केंद्र स्थानी लक्ष असलेल्या बारामती लोकसभेवर सुप्रिया सुळे चौथ्यांदा मोठ्या फरकाने विजयी झाल्या. त्यामुळे भाजपामध्ये अजित पवारांबाबत मोठी नाराजी दिसत आहे.
अजित पवारांना सत्तेत सामील केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आणि भारतीय जनता पार्टीच्या केडरमध्ये मोठी नाराजी उफाळून अली. त्यामुळे अजित पवारांना घेऊन फायदा नाही तर तोटा झाला, असं आरएसएसच्.या मुख पत्रात लिहिण्यात आलं आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे, परंतु ४८ पैकी आम्हला चार जागा लढवण्यासाठी दिल्या गेल्या, त्या पैकी दोन जागांवर उमेवार आयत केले गेले होते आणि एक जागा भाजपाच्या सांगण्यावरून महादेव जानकर यांना देण्यात आली. म्हणून आमच्या पदरी दोन जगा आल्या आणि यामधील एका जागेवर विजय मिळाला. तरी पण आमच्या मुळे ४८ जागांवर परिणाम कसा झाला? आम्ही मानतो की थोडं बॅकफूटवर आपण गेलो आहे. पण, हीच परिस्थिती इतर राज्यात पण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये इतक्या कमी जागा मिळतील असं वाटतं नव्हतं पण झालं. म्हणून फक्त अजित पवारांमुळे भाजपला फटका बसला, असं म्हणणं योग्य नाही, असं म्हणत छगन भुजबळ यांनी सुनावलं आहे.