चंद्रकांत पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी

chandrakant patil News : सांगलीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असताना, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शेतकऱ्यांची बाचाबाची झाली. पाटील यांनी आंदोलकांना विरोध कमी असल्याचा दावा केला, ज्यामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.

(फोटोLipi)

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : : शक्तिपीठ महामार्ग कायमचा रद्द करा या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यावेळी पालकमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांना शेतकरी निवेदन द्यायला गेले. यावेळी निवेदन देण्यावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी देखील चळवळीतून पुढे आलो आहे. माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलायचे नाही असे म्हणत या महामार्गाला केवळ पाच शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे ते म्हणाले. यावेळी शेतकरी आक्रमक होताच पोलिस पुढे आल्याने चंद्रकांत पाटील पोलिसांवर संतापले. पोलिस निरीक्षकांनाच सर्वांसमोर झापले. यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या उभाराहून पूर्णपणे ऐकून न घेतल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
Sangli News : पोहता येत नसतानाही विहिरीत उतरले, ४० फूट खोल पाण्याचा अंदाज चुकला आणि… सांगलीत हळहळ
यावेळी पोलिसांनी आंदोलकाना गेटवर अडवून धरले. संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीकडून परिसर दमावून सोडला. गेल्या काही दिवसांपासून शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून कडाक्याचा विरोध होताना दिसतोय. शेतकऱ्यांमध्ये आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे यावेळी बघायला मिळाले. शेतकरी आक्रमक होताना दिसले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अमली पदार्थ विरोधी कृती कार्यक्रमातील भाषणात चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशामध्ये युद्ध स्थिती निर्माण झाली आहे, काय होईल हे माहित नाही.

पण आगामी काळात समोरासमोर युद्ध न होता सायबर युद्ध होतील. यामध्ये देशाचा डाटा चोरला जाईल, सायबर हल्ला करत देशातली कॅश चोरली जाईल, तसेच मोठ्या प्रमाणात देशातील तरुण ड्रग्सच्या माध्यमातून व्यसनाधीन बनवले जातील. त्यामुळे आपला देश आर्थिक दृष्ट्या सक्षम राहणार नाही. भारताची ५ हजार वर्षांपूर्वीची संस्कृती ही दुसऱ्यावर आक्रमण करण्याची नाही. देशावर जे आक्रमण करायला आले ते आक्रमण परतवू. आलेल्या आक्रमकांशी लढाई केली. मात्र, दुसऱ्याचा भूभाग ताब्यात घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

शितल मुंढे

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)