Chanakya Niti:आचार्य चाणक्य यांना कोटील्य देखील म्हटले जाते.चाणक्यांनी आपल्या जीवनातील विविध अनुभवांवर आधारित अनेक ग्रंथाची रचना केली आहे. जी चाणक्य निती नावाचा ग्रंथ देखील त्यांनी लिहीला आहे.या ग्रंथात त्यांनी जीवनातील विविध पैलूवर विस्ताराने भाष्य केले आहे. ज्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक,नैतिक आणि खाजगी जीवना संदर्भात विषयांवरही लिहीले आहे. चाणक्य नितीत पुरुष आणि स्री दोघांचे गुण आणि अवगुणाचीही चर्चा केली आहे.
आचार्य चाणक्यांनी स्रियांमधील गुणदोषावर खास भाष्य केले आहे.त्यांनी स्रियांमधील काही जन्मजात दोष सांगितलेले आहेत. महिलांमध्ये काही जन्मजात स्वभाव विशेष असतात. चाणक्यांनी महिलांच्या संदर्भात एक श्लोक लिहीलेला आहे.
अनृतं साहसं माया मूर्खत्वमितलोभिता।
अशौचत्वं निर्दयत्वं स्त्रीणां दोषा: स्वभावजा:।।
आचार्य चाणक्य यांच्या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. चाणक्य या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना म्हणतात की खोटे बोलणे, साहस, छल-कपट, मुर्खता, अत्यंत लोभ, अपवित्रता आणि निर्दयता हे महिलांचे स्वाभाविक दोष आहेत.
आचार्य चाणक्य यांच्या मते साहसी असणे हा महिलांचा जन्मजात गुण असतो. त्या आपल्या दु:साहसाने कोणतेही काम करु शकतात. त्यामुळे त्यांच्यावर जास्त भरोसा ठेवणे योग्य नाही. चाणक्य नितीच्या मते महिला स्वाभाविक रुपानेच लाल आणि लोभी असतात. परंतू तरीही नारी ममता,करुणा, दया आणि क्षमा यांच्या एकमात्र स्थान असतात. त्यांच्या शिवाय पुरुषाचे जीवन अधुरे आहे.