मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आठवड्याअखेर प्रचंड त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. ठाणे स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी फलाट क्रमांक पाचचे मॉड्युलर फलाटाच्या मदतीने रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी ६२ तासांचा ब्लॉक घेण्याची चाचपणी मध्य रेल्वेने सुरू केली आहे.सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक ९/१०ची लांबी वाढवण्यासाठी १५ दिवसांचा ब्लॉक सुरू असून, ३० मे ते २ जून दरम्यान ३६ तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. याच कालावधीत ठाणे स्थानकातील ब्लॉक घोषित होण्याची शक्यता आहे. सीएसएमटीतील ३६ तासांच्या ब्लॉकमुळे १००हून अधिक मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. लोकल फेऱ्या रद्द करण्याबाबतचे अंतिम नियोजन सुरू असून लवकरच त्याची माहिती जाहीर करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठाणे स्थानकातील रोजची प्रवासीसंख्या सुमारे पाच लाख आहे. स्थानकातील फलाट क्रमांक ५-६ हा अतिवर्दळीचा फलाट आहे. यामुळे फलाट क्रमांक पाचची रुंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फलाट क्रमांक पाचवरून जलद लोकल आणि मेल-एक्स्प्रेसची वाहतूक होते. सध्या फलाटांची रुंदी १० मीटर असून रुंदीकरणानंतर १३ मीटर होणार आहे. रुंदीकरणाचे काम जलद गतीने आणि कमी वेळेत करण्यासाठी मॉड्युलर फलाटाचा वापर करण्यात येणार आहे.
मॉड्युलर फलाटामध्ये ‘प्री-कास्ट ब्लॉक्स’चा वापर करण्यात येतो. पोकलेन आणि क्रेनच्या मदतीने तयार ‘प्री-कास्ट ब्लॉक्स’ फलाटालगत ठेवून त्यांची काँक्रीटच्या मदतीने जोडणी केली जाते. तत्पूर्वी रूळ, ओव्हरहेड वायर आणि अन्य साहित्य सरकवून अतिरिक्त जागा निर्माण करण्यात येणार आहे. अतिरिक्त जागेत मॉड्युलर फलाटासाठी जागा निर्माण करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच फलाट उभारण्यासाठी अशा पद्धतीचा वापर होणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे फलाट बांधकामासाठी फलाट भिंत, कोपिंग, फ्लोअरिंग आणि अन्य कामांसाठी साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, हे काम ६२ तासांच्या ब्लॉकमध्ये केले जाणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-२ अंतर्गत ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका उभारणीच्या निधीतून ठाण्यातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे, दादर आणि घाटकोपर स्थानकांतील गर्दी विभागण्यासाठी मुंबई विभागाकडून काम सुरू आहे. ठाणे स्थानकातील फलाट रुंदीकरण हे ठाणे स्थानकाच्या गर्दी विभागण्यासाठीच्या उपायांचा एक भाग आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.