Ceasefire : पाकिस्तान अजूनही गोळीबार का करतंय? युद्धविराम झालाच नाही, मग काय झालं?; निवृत्त कर्नलने इतिहासाचे दाखले देत काय सांगितलं?

सीजफायर की स्टॉप फायर?Image Credit source: गुगल

India Pakistan Ceasefire or Stop Fire : भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यानंतर अवघ्या तीन दिवसातच पाकिस्तान घायाळ झाला. त्याने भारताकडे कारवाई थांबवण्याची विनंती केली. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह इतर अनेक देशांना मध्यस्थीचा नवस केला. अखेर दोन्ही देशांनी काल संध्याकाळी 5 वाजता युद्धविराम झाला. पण त्यानंतर अवघ्या तीन तासातच पाकने शस्त्रसंधी, युद्धविरामाचे उल्लंघन केले. पाकिस्तानने सीमा रेषेवर गोळीबार केला. मग सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे की पाकिस्तान गोळीबार का करत आहे?, त्यावर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सविस्तर उत्तर दिले आहे.

सीजफायर नाही स्टॉप फायर

या सर्व प्रकरणावर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, पहिली गोष्ट म्हणजे हा युद्ध विराम नव्हता कारण आपलं युद्ध झालं नाही तर चकमक झाली. हा स्टॉप फायर होता. स्टऑप फायर करण्याचा करार झाला असे ते म्हणाले. याविषयीची महत्त्वाचे विश्लेषण त्यांनी केले. सीजफायर नाही तर स्टॉप फायर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मग फायरिंगचे कारण तरी काय?

मात्र पाकिस्तानची जुनी सवय आहे जोपर्यंत अशा करारावर हस्ताक्षर होत नाही, तोपर्यंत ते फायर करतच राहतात हे आम्ही 1971 मध्ये सुद्धा बघितलं त्यावेळी सुद्धा त्यांनी आमचे सेना दिल्लीपर्यंत पोहोचण्याच्या आधी त्यांनी फायर सुरू केलं होतं. तसंच कारगिलमध्ये सुद्धा झालं तिथे सुद्धा शस्त्रसंधीचा उल्लंघन पाकिस्तानी केलं होतं ते शेवटपर्यंत म्हणतात की जाते – जाते भी मारके जायेंगे असा त्यांचा स्वभाव आहे आणि ते बोलून सुद्धा दाखवतात.

त्यांनी स्टाफ फायर ला मान्यता दिली असली तरी ते म्हणतात की हा निर्णय गव्हर्मेंटने घेतला आमच्यापर्यंत आदेश आले नाही जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही फायर करत राहणार. त्यामुळे त्यांनी ड्रोन आणि मिसाईल चा हल्ला चालू ठेवला असेल असं मला वाटतं. परंतु त्यामुळे काही नुकसान झालं असं पुढे आले नाही. आज प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर त्याविषयी कळेल. स्फोट झाले आहे मात्र कुठे झाले हे अजून पुढे आलेलं नाही.

सर्व खेळ काश्मीरसाठीच

त्यांचे ड्रोन आले असतील आणि आपल्या सिस्टीम ने त्याच्यावर नियंत्रण मिळविला क्रॉस बॉर्डर फायर हे सुरूच राहील कारण ते त्यांच कश्मीरसाठी आहे कश्मीर घेणार नाही हे त्यांनी सांगितलं नाही ते नेहमीच म्हणतात काश्मीर हमारा है आणि ते मरेपर्यंत हे करत राहील असं वाटतं, अशी प्रतिक्रिया कर्नल पटवर्धन यांनी दिली.

पाकिस्तानचे मोठे नुकसान

पाकिस्ताननी स्टाफ फायर केलं, कारण त्यांचा प्रचंड नुकसान झालेला आहे. त्यांची यंत्रणा ध्वस्त झालेली आहे. त्यांचे सहा एअर फिल्डला क्षती पोहोचली आहे. संसाधने नष्ट झाली आहे. पाकिस्तानचा जवळजवळ आठ ते दहा हजार कोटी डॉलरचा खर्च यावर झाला असेल ते नुकसान झालेले आहे.

तुर्कीने त्यांना दिलेले 300 ते 400 ड्रोन होते ते सुद्धा नष्ट झाले आहे. त्यामुळे हे भरून काढण्याकरता पाकिस्तानला वेळ लागेल जो त्यांना पैसा मिळाला आहे तो पैसा ते इकडे वळवतील पण त्यांचा झालेला नुकसान भरून येणं मुश्कील आहे, अशी प्रतिक्रिया कर्नल अभय पटवर्धन यांनी दिली.

गाफील राहून चालणार नाही

भारताला सतत सीमेवर आणि आपल्या बेसेस वर सतर्क राहायला पाहिजे जोपर्यंत कराराला मूर्त स्वरूप मिळत नाही तोपर्यंत आपल्याला सतर्क राहण गरजेचा आहे पाकिस्तान हा कुत्र्याच्या वाकड्या शेपटी सारखा आहे त्याची शेपटी थोडी जरी सरळ झाली तरी ती लगेच वाकडी होते आणि त्या वाकड्या शेपटीचा आपल्याला अनुभव येतो आहे अस निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)