पुढे पुनमचे वडील आजारपणात गेले जाताना त्यांच्या मनात एक स्वप्न अधुरं राहिलं होतं ते म्हणजे पुनमे खूप शिकावं. गेल्या वर्षी पूनमच्या वडिलांचे निधन झालं. नेमकं निधन झालं त्याच वर्षी पूजा सीए परीक्षेचा दुसरा अटेम्प्ट देत होती. वडील अंथरुणाला खिळलेले होते, त्यामुळे वडिलांची सेवा करताना पूनमचा अभ्यास कुठेतरी कमी झाला. गेल्या वर्षी पूनमला यश मिळवत आलं नाही. मात्र, वडिलांचे स्वप्न पूनम जगत होती. वडील गेले तरी त्यांचे स्वप्न पूर्ण करायचं हे तिने मनाशी ठाम ठरवलं होतं.
आईने दुहेरी कष्ट सुरू केले लोकांच्या घरी धुनी भांडीचे काम करायचे आणि त्यानंतर हार देखील विकायचे. आईने कष्ट करून पूनमच शिक्षण सुरूच ठेवलं आणि पूनमने देखील आपल्या अभ्यासाचे तास वाढवत अखेर सीए परीक्षेत यश मिळवलं आणि आज पूनम सीए झाली. 300 पैकी 175 गुण मिळवत दहा बाय दहाच्या एका खोलीत राहणारी पूनम सीए झाली आहे.
पूनमने प्राथमिक शिक्षण अहिल्यादेवी शाळेत घेतलं, पदवी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समधून घेतली. पुढे काय करायचं याचा संभ्रम पूनमच्या मनात होता. मात्र आई ज्या ठिकाणी धुनी भांडीच काम करायची त्या ठिकाणच्या एका काकूने पुनमची हुशारी ओळखली आणि तिला सीए करण्याचा सल्ला दिला इतकच नाही तर त्याबद्दल तिला मार्गदर्शन देखील केलं. अखेर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पूनमने यश मिळवलं आणि आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले.
आपल्या यशाचं सगळं श्रेय पूनम आई-वडिलांना देते. ‘ज्यावेळेस मी निकाल पाहिला त्यावेळेस सर्वप्रथम माझ्यासमोर माझ्या आई-वडिलांचे कष्ट करतानाचे चेहरेचं आले. पण हे यश पाहायला माझे वडील आज जिवंत हवे होते.’ असं म्हणताना पूनम आपल्या अश्रूंना आवडू शकली नाही. आता माझ्या आई-वडिलांनी खूप कष्ट केले आहे. मला या लायक त्यांनी बनवला आहे. वडील तर आम्हाला सोडून गेले मात्र आईचं पुढचं आयुष्य सुखात घालवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं पुनम म्हणते.
पुण्यातील पुलाची वाडीसारख्या छोटाशा भागात एका खोलीत राहणाऱ्या कुटुंबात पुनम वाढली दोन वेळा अपयश आलं. घरी अठरा विश्व दारिद्र्य असून देखील ती खचली नाही. अडथळ्यांसोबत शर्यत सुरू होती. मात्र यश मिळवायच असेल तर पावलांना थकून चालणार नाही. हे तिने आपल्या मनाशी ठाम ठरवलं होतं. अखेर अडथळ्यांच्या या शर्यतीत पूनम विजयी झाली. आणि आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले. ज्या पुण्यात सावित्रीमाईंनी मुलींच्या शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली, त्या पुण्यात सावित्रीच्या या लेकीने एक नवा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे.