स्वत:चे घर विकत घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण हल्ली प्रॉपर्टीच्या किमती खूप जास्त झाल्या आहेत. सर्वसामान्यांना घर खरेदी करणे अत्यंत अवघड झाले आहे. काही लोक गृहकर्ज घेऊन घर खरेदी करतात, पण नंतर दर महिन्याला गृहकर्जाचा EMI लोकांसाठी ओझे ठरतो. अशा परिस्थितीत तुम्हीही असाल तर आज आम्ही तुम्हाला होम लोनच्या प्रचंड EMI पासून लवकरात लवकर सुटका कशी मिळवू शकता, हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
समजा तुम्ही 25 वर्षांसाठी 50 लाखांचे गृहकर्ज घेतले आहे आणि तुम्हाला हे कर्ज 8.5 टक्के व्याजदराने मिळाले आहे, तर तुम्हाला दरमहा 40,000 रुपये EMI म्हणून भरावे लागतील.
अतिरिक्त EMI पेमेंट करा
जर तुम्हाला तुमच्या लोनमधून सुटका करायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त EMI भरावा लागेल. आपण दरवर्षी अतिरिक्त EMI भरू शकता. यामुळे तुमची कर्जाची रक्कम लवकर कमी होईल, ज्यामुळे तुमचे व्याजही कमी होईल आणि तुमचे कर्जही लवकर संपेल.
दरवर्षी EMI वाढवा
दर वर्षी तुमचा मासिक EMI वाढवा. त्यात दरवर्षी 7.5 टक्के दराने वाढ करता येते. असे केल्याने कर्ज लवकर संपुष्टात येईल. त्याचबरोबर मूळ रकमेत कपात केल्याने व्याजही कमी होणार आहे.
बचतीचा वापर करा
जर तुमच्याकडे बचत असेल तर तुम्ही अतिरिक्त पेमेंट करून तुमचे कर्ज लवकर फेडू शकता. त्यासाठी बचत करावी लागेल आणि जास्तीचा खर्च कमी करावा लागेल.
कर्जाची मुदत वाढवा
गृहकर्जाचा मासिक EMI कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या कर्जाची मुदत वाढवू शकता. असे केल्याने तुमचा मासिक EMI देखील कमी होईल. मात्र, असे केल्याने तुम्हाला अधिक व्याज द्यावे लागणार आहे.
कमी EMI साठी होम लोन ट्रान्सफर करा
तुमच्या सध्याच्या बँके व्यतिरिक्त अन्य बँक कमी व्याजदराने कर्ज देत असेल तर तुम्ही तुमचे गृहकर्ज त्या बँकेत ट्रान्सफर करू शकता.
सिबिल स्कोअरच्या आधारे व्याजदर कमी करा
बँकेशी बोलून तुम्ही तुमचे व्याजदर कमी करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या चांगल्या सिबिल स्कोअरचा आधार घ्यावा.
अधिक डाऊन पेमेंट करा
गृहकर्ज घेताना जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मासिक EMI कमी होईल.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)