Businessman Ended Life: सी लिंकवरून उडी मारण्याआधी व्यापाऱ्याने मुलाला केला व्हीडीओ काॅल; पोलिसांना कारमधून एक चिठ्ठी सापडली

म. टा. खास प्रतिनिेधी, मुंबई

वांद्रे वरळी सागरी सेतूवरून उडी मारून व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. भावेश सेठ (५८) असे व्यापाऱ्याचे नाव असून समुद्रात उडी मारण्यापूर्वी त्याने मुलाला व्हीडीओ कॅाल केल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांना सेठ यांच्या कारमधून एक चिठ्ठी सापडली असून त्यातून आर्थिक चणचणीतून हे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

घाटकोपर येथे वास्तव्यास असलेले भावेश दुपारी साडेतीन वाजता कारने वांद्रे वरळी सागरी सेतूवर गेले. त्यांनी रस्त्याच्या कडेला कार थांबवून मुलास व्हीडीओ कॅाल केला आणि त्यानंतर काही क्षणातच पाण्यात उडी मारली. येथून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना उडी मारताना पाहिल्याने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षातून माहीती मिळताच वांद्रे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. याबाबतची माहीती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. सुमारे तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर भावेश यांचा मृतदेह हाती लागला.
Wagh Nakh: छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नखे भारतात दाखल; मुंबई विमानतळावरून साताऱ्यासाठी रवाना, १९ जुलैला होणार भव्य कार्यक्रम

पोलिसांनी सेतूवर लावण्यात आलेल्या त्यांच्या कारमध्ये चिठ्ठी सापडली. यात आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यातील मजकूर पाहता आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Imtiyaz Jaleel: इम्तियाज जलील तुमचे स्वागत कोल्हापुरी पायताणाने करू; बाहेरून येऊन इथं मोर्चा काढण्याच काय काम नाही- हिंदू संघटनांनी दिला इशारा

२४ तासातील दुसरी घटना

मुंबईत गेल्या २४ तासात झालेली अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. सोमवारी एका २६ वर्षीय तरुणीने सकाळी ११च्या सुमारास मरिन ड्राइव्ह येथे समुद्रात उडी घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेली मुलगी टाटा कंसल्टेंसी सर्विसेस या कंपनीत कामाला होती. आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव ममता कदम असे पोलिसांनी सांगितले. समुद्रकिनारी एक तरुणी बुडत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलास बोलवण्यात आले आणि बुडणाऱ्या तरुणीला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

आत्महत्या करण्याआधी मोबाईल, लॅपटॉप, दागिने आणि पर्स हे सर्व काही सॅकमध्ये काढून ठेवले. तिने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाचे कारण अद्याप समजू शकले नाही.