Breaking News 5th July 2024: विश्वविजेता भारतीय संघ मुंबईत दाखल, स्वागतासाठी लाखोंचा जनसागर

कांदा खरेदी संशयाच्या भोवऱ्यात; पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह, केंद्रीय समितीसमोर शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोष

ठराविक फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांकडून होणारी कांद्याची खरेदी, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांचा होणारा गैरवापर आणि राज्याबाहेरील फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांचा स्थानिक स्तरावर कांदा खरेदीत वाढता हस्तक्षेप यासह आयात-निर्यात धोरण आणि कांदा खरेदीतील पारदर्शकता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्रीय समितीच्या अधिकाऱ्यांपुढे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हा विषय चव्हाट्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात कांदा उलाढालींची माहिती घेण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाची समिती आली होती. या समि