Breaking News 19th July 2024: वाचा शुक्रवार १९ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

पुण्यात पूर्व वैमनस्यातून आईस्क्रीम चालकावर गोळीबार, सासवड येथील घटना, हल्लेखोर फरार

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका आईस्क्रीम दुकानाच्या मालकावर तीन अज्ञात हल्लेकरूंनी जवळून गोळीबार केला, या गोळीबारामध्ये आईस्क्रीम मालक गंभीर जखमी झाला आहे, आठ महिन्यांपूर्वीच्या वादातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांकडून प्रथमदर्शनी सांगण्यात आले आहे, या घटनेमुळे सासवड परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे