Breaking News 10th July 2024: वाचा बुधवार १० जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

चंद्रपुरात भीषण अपघात, दोघे जागीच ठा, तिघे गंभीर जखमी

भरधाव वेगात असलेल्या कारने सामोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.लग्न आटोपून वडसाला परत येत असताना आज पहाटे चार वाजता ब्रह्मपुरी जवळ ही घटना घडली.दिलीप परसवानी आणि महेक परसवानी असे अपघातातील मृतकाची नावे आहेत.तर जितेंद्र,गौरव,उदय, हे तिघे गंभीर जखमी आहेत.