Breaking News : विधानसभेत सादर होणार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प, निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणाची शक्यता

Rain Alert : पुढील काही तासात राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अर्लट

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण, ठाणे, पालघर, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. समुद्रसपाटीवरील महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. २७ जून ते ३१ जून आणि १ जुलै रोजी कोकण, गोवा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा येथे पुढील काही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.