Breaking News : वाचा शनिवार ६ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Ahmednagar News: मविआच्या वतीने सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलनाच्या ठिकाणी उभारण्यात आली दुधाच्या कॅनची हंडी

मविआच्या वतीने सुरू असलेल्या शेतकरी जनआक्रोश आंदोलनाच्या ठिकाणी दुधाच्या कॅनची हंडी उभारण्यात आली आहे. त्याला कांद्याच्या माळा लावण्यात आल्या असून आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढ्या म्हशी आणि गायी घेऊन नीलेश लंके आंदोलन करत आहेत.