Breaking News : वाचा शनिवार २२ जून २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

खासदार निलेश लंके आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

निलेश लंके यांच्या प्रचारात ठाकरे गटाचा मोठा वाटा होता. त्यामुळे आज नगर जिल्हातील शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर जाऊन ते भेट घेणार आहे. निकाल लागल्यानंतर राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आज त्यांच्या भेटीसाठी निलेश लंके मुंबईकडे रवाना झाले आहे.