Breaking News: वाचा मंगळवार २५ जून २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

सातारा – वाई शहर गोळीबाराच्या घटनेने हादरले, गोळीबारात एक जखमी, चौकशीसाठी एक पोलिसांच्या ताब्यात

सातारा : वाई एमआयडीसीतील चांदणी चौकात एका तरुणावर पूर्ववैमन्यातून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला, या गोळीबारात तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे, तर गोळीबार करणारे अज्ञात घटनास्थळावरून पळून गेले आहेत.