डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात पक्षप्रवेश होणार आहे. यानंतर एकनाथ शिंदेंकडून चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील आमदारकीसंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, खा. धैर्यशील माने, सांगलीतील स्थानिक आमदार सुहास बाबर, मंत्री उदय सामंत,मंत्री संजय शिरसाट, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री प्रकाश आबिटकर,मंत्री प्रताप सरनाईक हे नेते उपस्थितीत राहणार आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.