Maharashtra Election : महायुतीत नसलेल्या घटक पक्षांसोबत भाजपकडून बोलणी सुरु करण्यात आली आहे. महायुती जर बहुमतापासून दूर राहिली, तर छोट्या घटक पक्षांची मोट बांधण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
महायुतीत नसलेल्या घटक पक्षांसोबत भाजपकडून बोलणी सुरु करण्यात आली आहे. महायुती जर बहुमतापासून दूर राहिली, तर छोट्या घटक पक्षांची मोट बांधण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. महायुतीच्या नेत्यांची अपक्ष आणि छोट्या पक्षांसोबत बातचित सुरु झाली आहे.
Maharashtra Voting Percent : वाढलेल्या मतटक्क्याचा लाभ कुणाला? गेली विधानसभा ते यंदाची लोकसभा… निकालाआधीच ‘निकाल’ जाणून घ्या
सत्तेत वाटा देऊन अशा अपक्ष आणि लहान घटकपक्षांना सरकारसोबत घेण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल. बहुतांश एक्झिट पोल बाजूने असले, तरी भाजप सतर्क राहून यावेळी सावध पावलं टाकणार आहे. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, बच्चू कडू यांची प्रहार संघटना यांच्याशी बोलणी होण्याची शक्यता आहे. आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जाऊ शकतात.
Axis My India Exit Poll : जनतेने ठरवला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा; शिंदे, फडणवीस, ठाकरे, दादा की नाना? सर्वाधिक पसंती कुणाला? चक्रावणारे आकडे
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही सत्तेसोबत राहण्याची आपली भूमिका जाहीर केली आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी जर उद्या वंचित बहुजन आघाडीला संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करु शकणाऱ्या पक्ष किंवा युतीसोबत राहणे पसंत करु, अशी भूमिका ‘एक्स’ सोशल मीडियावरुन ट्विट करत आंबेडकरांनी व्यक्त केली.