‘WTTF’ ट्रॅव्हल आणि टुरिझमला कसे केले प्रोत्साहित? भाजप खासदार महेश शर्मा यांनी नेमकं सांगितलं

भाजपचे खासदार महेश शर्मा हे टीव्ही9 च्या ‘World Travel and Tourism Festival’मध्ये सहभागी झाले. टीव्ही9 ने पुढाकार घेऊन ट्रॅव्हल आणि टुरिझमला कसं प्रोत्साहित करण्याचं काम केलं हे महेश शर्मा यांनी सांगितलं. देशात विविध ठिकाणची वेगवेगळी संस्कृती आणि सौंदर्य आहे. अशा ठिकाणी अशा प्रकारचा पुढाकार घेणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याबद्दल मी टीव्ही9 चे आभारच मानतो, असं खासदार महेश शर्मा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील टुरिझमला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि संकल्पाचा हा परिणाम आहे. आज लक्षद्वीपने मालदीवला मागे टाकलं आहे. मी 70 हून अधिक देश फिरलो आहे. पण जग फिरण्यापूर्वी संपूर्ण भारतात फिरणं सर्वात महत्त्वाचं आहे. हेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही सांगत असतात, असं महेश शर्मा म्हणाले.

टीव्ही9चे आभार

देशाच्या जीडीपीचा 6.8 टक्के भाग हा टुरिझममधून येतो. आज ट्रॅव्हल्स आणि टुरिझम इंडेक्समध्ये भारताने 30 पॉइंटची झेप घेतली आहे. कधी काळी या इंडेक्समध्ये आपण 40व्या क्रमांकावर असायचो. पंतप्रधान नेहमी सांगतात की मोठं काम करा. त्यामुळेच ताजचं टुरिझम बदललं आहे. या कामात आता टीव्ही9ने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मी टीव्ही9चे आभार मानतो. या गोष्टी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असं ते म्हणाले. महेश शर्मा हे नोएडाच्या गौतम बुद्ध नगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

दिल्लीच्या मेजर ध्यानचंजद नॅशनल स्टेडियममध्ये 14 फेब्रुवारीपासून 16 फेब्रुवारीपर्यंत World Travel & Tourism Festival चे आयोजन करण्यात आले आहे. देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क टीव्ही9, रेड हॅट कम्युनिकेशन्स मिळून World Travel & Tourism Festival सेलिब्रेट करत आहे. या फेस्टिव्हलमध्ये देशातील प्रसिद्ध पॉप सिंगर पापोन यांचा लाइव्ह कॉन्सर्टही होणार आहे.

कसं कराल फेस्टिव्हलचं तिकीट बुक?

तिकिट बुक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी इव्हेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल ( इथे क्लिक करा)

या नंतर तुम्हाला वेबसाईटवर तुमची डिटेल्स म्हणजे नाव, लिंग, ईमेल आयडी आणि वय टाकावं लागेल

पर्सनल डिटेल भरल्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी फेस्टिव्हलला जायचंय ती तारीख सिलेक्ट करावी लागेल

ही संपूर्ण माहिती भरल्यावर फॉर्म सबमिट करा आणि कन्फर्मेशनसाठी सूचनांचं पालन करा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)