मोठी बातमी! सुरेश धस नरमले, प्राजक्ता माळींची मागितली माफी, नेमकं काय म्हणाले?

मोठी बातमी समोर येत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोलताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी आपली माफी मागवी अशी मागणी केली होती. मात्र मी काही चुकीचं बोललो नाही, प्राजक्ता ताईंचा अपमान होईल असं बोललो नाही, मी माझ्या वक्तव्याचं समर्थन करतो त्यामुळे माफी मागणार नाही अशी भूमिका यावर सुरेश धस यांनी घेतली होती.  मात्र त्यांनी आता प्राजक्ता माळी यांची  माफी मागितली आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस? 

सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागितली आहे. प्राजक्ता माळी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘प्राजक्ताताई माळी यांच्या संदर्भात मी केलेल्या वक्तव्याचा गैर अर्थ काढण्यात आला आहे, मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता. मी प्राजक्ता ताई आणि समस्त स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या विधानाने जर त्यांचे किंवा कुणाचेही मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

प्राजक्ता माळींनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट  

सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली होती, या पत्रकार परिषदेमधून त्यांनी आपली भूमिका मांडली. सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर मी प्राजक्ता ताईंचा अपमान होईल असं बोललो नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर याच संदर्भात प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. अखेर आता सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागितली आहे.  मी प्राजक्ता ताई आणि समस्त स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या विधानाने जर त्यांचे किंवा कुणाचेही मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)