मोठी बातमी! दानवे, खैरेंमधील वाद विकोपाला? पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरेंची दांडी

मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र आता अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे, चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला दांडी मारली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दानवे यांच्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला येणं टाळलं, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे हे गैरहजर होते, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. यामुळे आता दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दानवेंमुळेच चंद्रकांत खैरे यांनी या मेळाव्याला येणं टाळल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासूनच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना लोकासभेचं तिकीट देण्यात आलं, मात्र दानवे हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. तेव्हा पक्ष नेतृत्वाकडून दानवे यांची समजूत काढण्यात आली होती. खैरे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खैरे यांनी दानवेंवर आरोप केले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा दानवेंवर निशाणा साधला होता. दानवे मला छत्रपती संभाजीनगरातील कोणत्याही कार्यक्रमाला बोलावत नाहीत, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं. ‘ मी सुरुवातीपासूनच शिवसेनेचा नेता आहे. मी इथे शिवसेना वाढवली आहे, ते आता आले आहेत, मात्र दानवे हे मला कोणत्याही कार्यक्रमाला बोलावत नाहीत, नियोजन करत नाहीत,’ असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता चंद्रकांत खैरे हे मेळाव्याला उपस्थित नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)