मोठी बातमी! भाजपच्या मंचावर नेहमी दिसणारा मोठा उद्योजक शरद पवारांच्या भेटीला, घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार धक्का बसला, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं. महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तब्बल 132 जागा निवडून आल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठं यश मिळालं. मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे तीन पक्ष मिळून केवळ त्यांना 50 जागाच जिंकता आल्या. विधानसभेत सपाटून झालेल्या पराभवानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं.

शरद पवार यांच्या वाढदिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली. त्यानंतर पुन्हा एकदा काका आणि पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटात देखील अस्वस्तता होती. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एका बड्या उद्योजकानं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या उद्योजकाचे भाजपसोबत देखील जवळचे संबंध आहेत.

भाजपच्या मंचावर नेहमी दिसणारे मोठे उद्योजक पुनीत बालन  यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. मात्र काही दिवसांमध्येच महापालिकांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीवर प्रतिक्रिया देताना आपण एका सामाजिक कामानिमित्त शरद पवार यांची भेट घेतल्याचं उद्योजक पुनीत बालन यांनी म्हटलं आहे.  मात्र आता या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)