राज ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका निवडणूकांचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे यांच्या विषयीच्या एका प्रश्नाला महेश मांजरेकर याच्या पॉडकास्टमध्ये उत्तर दिले त्यावर पुन्हा एकदा मराठी माणसांत ठाकरे घराण्यातील हे भाऊ पुन्हा एकत्र येतील का याची चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात एकेकाळी शिवसेनेचे मातब्बर नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले आहे.
उद्धव आणि राज एकत्र येणं शक्य आहे का ?
अजून मला तरी याबाबतीची काही माहीती नाही. पण एकत्र येणे हे चांगले आहे. पूर्वी भाजप सेना युती होती त्यावेळी त्यांना चांगली संधी आली होती. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते . माझ्या त्यांना शुभेच्छा असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते दोन्ही एकत्र आलेत तर निश्चितपणे ठाकरेंची पुन्हा सद्दी येईल असेही भुजबळ म्हणाले. मी राज ठाकरे यांची मुलाखत पाहीलेली नाही. मला कल्पना नाही तुम्ही विचारत आहात म्हणून मी ही कमेंट करतोय असेही ते म्हणाले. आता मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे . दोन्ही एकत्र आले तर त्यांना यश मिळू शकते . मात्र काय अटी शर्ती आहेत आणि त्या एकमेकांना मान्य आहेत नाहीत हे बघावे लागेल असे एका प्रश्नाच्या उत्तर देताना भुजबळ यांनी सांगितले.
राज यांच्या घरी शिंदे यांचा पाहुणचार
शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्याकडे जातात, त्यांचे सहकारी देखील जात असतात. त्यात राजकीय चर्चा झालेली नाही असे म्हणतात. भोजनासाठी कोण कशाला चर्चा करेल. नक्कीच राजकारणावर चर्चा होणार आहे. ठाकरे कुटुंबप्रमाणे पवार कुटुंब एकत्र यावे का ?.याप्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की कुठलेही कुटुंब वा माझे कुटुंब फुटले तर कोणालाही आनंद होणार नाही. राजकारणातील वेगळी झालेली कुटुंबे एकत्रित आली तर आनंदच आहे असे भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. दोन्ही ठाकरे हे लढवय्ये आहेत. त्यांचं एकत्रित येणे ही काही हतबलता नाही असेही छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.