वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ‘या’ चुका टाळा, नुकसान झालंच म्हणून समजा !

कपडे धुताना ‘या’ चुका टाळाImage Credit source: TV9 bharatvasrh

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळेचा अभाव आहे. त्यामुळे या आधुनिक जगात घरातील कोणतेही काम कसे लवकर करता यासाठी इलेक्ट्रीक वस्तुंचा वापर केला जातो. अशातच कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जात आहे. त्याचबरोबर मशीनमध्ये कपडे धुताना कपड्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी काहीजण महागडे डिटर्जंट पावडर वापरतात. तसेच हे महागडे डिटर्जंट पावडर वापरूनही अनेकदा कपडे खूप लवकर खराब होतात. अनेकवेळा कपडे व्यवस्थित साफ होत नाहीत किंवा त्यांचा रंग सुटतो. त्यामुळे त्यांच्यासोबत धुतलेले इतर कपडेही खराब होतात. पण जर चांगल्या दर्जाचे कपडेही लवकर खराब झाले तर कपडे स्वच्छ करण्यात काही कमतरता असू शकते.

जर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुत असाल तर तुम्हाला काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे चांगले कपडे लवकर खराब होऊ शकतात. म्हणूनच जर तुम्ही कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरत असाल तर या खास गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात…

डिटर्जंट पावडरचा जास्त वापर

अनेकांना वाटते की जास्त डिटर्जंट पावडर वापरल्याने कपडे स्वच्छ होतील. पण असं नाहीये, उलट यामुळे कपडे लवकर खराब होतात. जास्त डिटर्जंट वापरल्याने भरपूर फेस तयार होतो जो कपड्यांमधून पूर्णपणे काढता येत नाही आणि त्यामुळे कपडे खराब होऊ लागतात. तसेच कपडे जास्त व कमी असल्यास डिटर्जंटचा वापर त्यानुसार करावा.

कापडाची काळजी घ्या

आपल्यापैकी बहुतेक जण कपडे धुताना हलक्या आणि गडद रंगांनुसार वेगवेगळे धुतात. पण कपडे त्यांच्या फॅब्रिकनुसार धुणे देखील महत्त्वाचे आहे. जर जीन्स आणि स्वेटरसारखे जड कपडे ड्रेसेस, शर्ट किंवा ब्लाउजसह मशीनमध्ये धुतले तर ते लवकर खराब होऊ शकतात. टॉवेल, बेडिंग आणि इतर जड वस्तू नेहमी कपड्यांपासून वेगळे धुवा. कपड्यांचे फॅब्रिक आणि वजन याचीही काळजी घ्या.

डाग स्वच्छ करा

कपड्यांवर डाग असल्यास, वॉशिंग मशीनमध्ये टाकण्यापूर्वी ते स्वच्छ करा. यासाठी तुम्ही कोणतेही उत्पादन किंवा घरगुती उपाय देखील वापरू शकता. तसेच कपड्यांवरील डाग काढताना अनेकजण गरम पाण्याचा जास्त वापर करतात. पण तसे करू नका कारण ते डाग सेट करू शकते. डाग काढण्यासाठी थंड पाणी वापरा.

वॉशिंग मशीन साफ ​​न करणे

कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन परिपूर्ण आहे. पण ते कपडे धुऊन झाल्यानंतर मशीन पूर्णपणे स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. कारण खराब कपड्यांमधून येणारी घाण, डिटर्जंटचा वास आणि इतर अनेक प्रकारची घाण मशीनमध्ये जमा होऊ लागते. म्हणून ते स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

जीन्सचे झिपर लावा. कारण यामुळे इतर कपड्यांचे नुकसान होऊ शकते. शर्ट धुताना बटणे उघडा.तसेच पॅन्ट किंवा शर्टच्या खिशात काहीही ठेवलेले नाही याची खात्री करा. कपड्यांवर पेन, मार्कर किंवा गम लावल्याने तुमचे कपडे आणि मशीन दोन्ही खराब होऊ शकतात. उदाहरणार्थ, मशीनमध्ये नाणे अडकल्याने मशीन लवकर खराब होऊ शकते. तसेच टिश्यूमुळेही कपडे खराब होऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)