भारतीयांच्या रोजच्या जेवणापासून ते चहापर्यंत अद्रक हा महत्त्वाचा घटक आहे. चवीसाठी आणि आरोग्यासाठी भारतीय अद्रकीचा वापर करतात. पण काही जण अद्रकीचा अतिरेक करतात. तिचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे आरोग्याला फटका बसू शकतो.
रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेत असाल तर अद्रकीचा अतिरिक्त वापर तुमच्यासाठी घातक ठरू शकतो.
उन्हाळ्यात अद्रकीचा जादा वापर केल्यास डिहायड्रेशन सारखी समस्या उद्धभवू शकते. ज्या व्यक्तींना जास्त घाम येतो, त्यांना ही समस्या जाणवू शकते.
डायबिटिज रुग्णांसाठी अद्रिकाचा जास्त वापर हानीकारक ठरू शकतो. जर तुम्ही डायबिटीजची औषधं घेत असाल तर अद्रकीचा अधिक वापर नुकसानदायक ठरू शकतो. त्यामुळे साखरेची पातळी खाली येऊ शकते.
अद्रक ही उष्ण असते. तिचे अधिक सेवन केल्यास डायरिया आणि उल्टी सारख्या समस्या होऊ शकतात.
काही जणांना त्वचेसंबंधी समस्या असतील तर त्यांना अद्रकीचा जास्त त्रास होऊ शकतो. अद्रकीचं जास्त सेवन केल्याने अडचण होऊ शकते.