आमचे दररोज 150 रुपयांचे नुकसान होईल
ऑटो युनियनचे नेते थॅम्पी कुरियन यांनी सीएनजी दर वाढीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”ऑटोरिक्षा चालकांचे दररोजचे 150 रुपयांपर्यंत नुकसान आहे. ऑटोरिक्षा चालकाला दररोज सीएनजी गॅस भरावा लागतो. अशातच सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे ऑटोरिक्षा चालकाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे ऑटोरिक्षाच्या भाड्यात सुधारणा करण्याची गरज आहे.”
तर टॅक्सी युनियनचे नेते प्रेम सिंग म्हणाले की, ” आम्हा टॅक्सी चालकांना देखील 28 ते 30 रुपयांची भाडेवाढ हवी आहे. वर्षानुवर्ष खर्चात वाढ होत चालली आहे. परंतु अंतिम मागणीपूर्वी आम्ही सदस्यांशी चर्चा करू”. या दोन्ही युनियन प्रस्तावासह अधिकृत निवेदन परिवहन विभागाला पाठवणार आहेत.
ऑक्टोबर 2022 मध्ये तीन रुपयांनी झाली भाडेवाढ
MMRTA ने ऑक्टोबर 2022 ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात 2 ते 3 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचे भाडे 21 रुपयांवरून 23 रुपये तर 25 वरून 28 रुपयांपर्यंत वाढले आहे.
दरम्यान, 8 जुलै रोजी महानगर गॅस लिमिटेडने मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीच्या किंमती 73.50/kg वरून 75/kg पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सीएनजी वाहनांचे प्रमाण वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षाचालक व टॅक्सीचालक यांच्या मागण्या मान्य झाल्या तर मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.