औरंगजेब कबर हटवाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
औरंगजेब काय राष्ट्रपुरुष होता काय? असा खडा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे. त्यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली औरंजेबाची कबर काढून टाकावी अशी मागणी केली आहे. या विषयाला सामाजिक रूप न देता त्याची कबर काढावी अशी आमच्या सर्वांची भूमिका असल्याचे लंके यांनी म्हटलं आहे. औरंगजेब समाजसेवक नव्हता असं देखील लंके यांनी म्हटलंय. तर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनंतर आता शरद पवारांच्या खासदारांनी देखील औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी केल्याने कबरीवरून आता राजकारण चांगलाच तापू लागलं आहे, असं म्हणता येईल.
बातमी अपडेट होत आहे…