शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे आमदार अशोक पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी अशोक पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली. त्यानंतर काही लोकांनी स्वार्थासाठी पक्ष फोडला. खरं मूळ पवार साहेबांचे होते. मात्र काही आमदारांची फौज तिकडे लागली. लोकशाहीमध्ये आता कुठे तरी नियमावली बदलण्याची वेळ आली आहे. पवार साहेबांनी तुम्हाला उमेदवारी दिली. आणि तुम्ही फुटताय हे कुठे तरी बदलले पाहिजे. प्रचाराच्या काळात पवार साहेबांच्या ज्या सभा झाल्या त्यानंतर सर्व सामन्यांची साथ पवार साहेबांना असल्याचंही अशोक पवार म्हणालेत.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
अजित पवार काय म्हणाले होते?
आम्ही ज्यावेळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळी आमच्या घरी मी बसलो होतो. डॉ. कोल्हे होते, अशोक पवार होते. सगळ्यांनी आपण हा चांगला निर्णय घेतला पाहिजे म्हटलं. सगळेजण माझ्या सोबत शपथविधीसाठी आले, कोल्हे साहेबांनी प्रतिक्रिया दिली. अशोक पवार मला म्हणत होते, दादा सत्ता असल्याशिवाय काय खरं नाही, असं सतत मला सांगणाऱ्यांपैकी तो एक होता. पण ज्या वेळेत शपथविधी पहिली मी घेतली, दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली, तिसरी किंवा चौथी शपथ दिलीप वळसे पाटील यांचे नाव आले, तिथं गडी बिथरला. तो म्हणाला ही शपथ घ्यायला दादांनी परवानगी द्यायला नको होती. मला यांना घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही. हा काय एवढा मोठा नेता आहे का ओ? अरे काय तू… तुला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं. आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो? असा सवाल अजित पवारांनी विचारला.