सुट्टीवर येणाऱ्या अधिकऱ्यांसारखे काम आदित्य यांचे आहे. उंटावरून शेळ्या आदित्य यांनी हाकू नयेत. मुंबई महापालिकेला सडेतोड उत्तर द्यावे लागतील. उद्धवजी यांनी त्यावेळी ही कोस्टल रोडची कामे महापालिकाकडे घेतली. उद्धवजींनी आदित्य यांच्या हट्टामुळे हे केले. मी त्यावेळी प्रश्न मांडले, विधानसभेत बोललो. या कामात महापालिकेने सब कॉन्ट्रॅक्टर नेमले होते का? त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला होता. आपल्याच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही उप कंत्राटदार म्हणून कामे देण्यात आली होती. ती दुय्यम दर्जाची झाली. कामांना विलंब झाला. भ्रष्टाचार झाला.महापालिकेने कारवाई का केली नाही? त्यांच्यावर दबाव होता का? असा थेट सवाल त्यांनी केला.
दरम्यान, आज दादर कार्यालयात झालेल्या मुंबई भाजपा पदाधिकारी बैठकी बाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारांची पक्षाने केलेली नोंदणी मोठी आहे. नोंदणी सबमिट केली आहे, त्यामुळे आम्हाला विजयाचा विश्वास आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय सुकानु समिती मध्ये मित्र पक्षांशी बोलून घेऊ. मुंबईची जागेबाबत आता ऊबाठा सेनेचा काही प्रश्नच नाही. गेली २४ वर्ष जनसंघ आणि भाजपकडे ही जागा आहे असे ही त्यांनी सांगितले.
काय केले होते आदित्य ठाकरेंनी ट्विट
आदित्य ठाकरे यांनी X या सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत म्हटले की, मविआ चे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णपणे तयार झालेला असता आणि नागरिकांसाठी खुला झाला असता.
पण, भ्रष्ट राजवटीने आमचं सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचं काम केलं.
फेब्रुवारीमध्ये अनेक वेळा उद्धाटनाच्या तारखा बदलत राहिल्या, त्यावेळेस मी ते निदर्शनासही आणले होते, आणि तेही फक्त एका लेनसाठी सुरु होते.
शेवटी आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत १ लेन उघडण्यात आली.
१ लेन, जी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंतच खुली असते!
मग आम्हाला नवीन टाईमलाइन देण्यात आली… आधी मार्च, नंतर एप्रिल, नंतर मे पर्यंत संपूर्ण रस्ता खुला केला जाईल. आता जवळपास जून आलाय…
@mybmc नागरिकांना कोस्टल रोड उघडण्याच्या अंतिम तारखेबद्दल अधिकृत अपडेट देईल का?
शिवाय, जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू तेव्हा हा विलंब का झाला ह्याची तपशीलवार चौकशी करूच!
आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या परदेशवारीवर केलेल्या टीकेनंतर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसेच कोस्टल रोडच्या गळतीचे प्रकरण आता ऐरणीवर आले आहेत. सत्ताधारी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष कसा लावणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.