पुणे मुळशी येथील वैष्णवी हगवणे हीने सासरच्या जाचाला कंठाळून जीवन संपवल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका विवाहितेने स्वत:स संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या नाशिक येथील भक्ती अपूर्व गुजराथी ( ३७ ) या विवाहितेने सासरच्या जाच आणि मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर तिच्या माहेरच्या मंडळींना तिच्या मृतदेहाला ताब्यात घेण्यास नकार देत फलक झळकावून मोर्चा काढला होता. अखेर पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर तिच्या मृतदेहावर काल अत्यंसंस्कार करण्यात आले.या प्रकरणात पसार झालेल्या पती,सासरे आणि सासू यांना अखेर अटक झाली आहे.
भक्ती अपूर्व गुजराथी (३७) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आपले जीवन संपवल्याने नाशिक येथे खळबळ उडाली होती.भक्तीच्या पालकांनी आपल्या मुलीचा सासरी छळ होत असल्याची तक्रार केली होती. भक्ती हीचे पती, नणंद आणि सासु आणि सासरे यांच्यावर भक्तीवला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर भक्ती हीचे पती आणि सासरीची मंडळी फरार झाली होती. अखेर या प्रकरणात नाशिक पोलिसांनी तिघा आरोपींना गुजरात येथून अटक केली.भक्ती गुजराती तिचे पती अथर्व गुजराती, सासरे योगेश गुजराती,सासू मधुरा गुजराथी अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गंगापूर पोलीस यासंदर्भात पुढील तपास करीत आहे. या तिघांना नाशिकच्या क्राईम ब्रँचने अटक करुन गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले होते असे सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक पद्मजा बढे यांनी सांगितले.
८ वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं
माझ्या मुलीला खूप टॉर्चर करायचे, दुसऱ्या जातीचे असल्याचे म्हणायचे. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती हे खरं असलं तरी तिने स्वत:ला संपवलं असं वाटत नाही. त्यांनीच काहीतरी केले आहे. ८ वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांना पाच वर्षांचा मुलगा झाला आहे. आधी सासू सासरे हीन वागणूक देतच होते. नंतर नवऱ्याकडूनही त्रास सुरू झाला. भावाजवळ मागणी केली होती. घरातील स्थिती पाहता आत्महत्या नसल्याचा संशय वाटतो असे भक्तीच्या वडीलांनी म्हटले आहे.
ही संपूर्ण घटनाच संशयास्पद आहे
ही संपूर्ण घटनाच संशयास्पद आहे.तसं नसतं तर आम्ही तक्रार केली नसती. समाज आमच्या सोबत नसता. आम्ही सर्वांचे आभार मानतो या बातम्या त्यांनी दाखवल्या. आणि ते आमच्या बाजूने उभे राहिले. त्या दिवसापासून त्यांच्या घरातले गायब होते, त्यांना गुजरात मधून अटक केली. ही घटना घडली तेव्हा अंत्यविधीला तरी ते उपस्थित राहीले असते. अथर्व याने तरी सांगायला हवं होत हे असं नाहीए म्हणून. त्यांनी जर कृत्य केलं नसतं तर मग पळून जायचं काही काम नव्हतं असे भक्तीचे मामा म्हणाले.त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी न्यायाची मागणी आहे आणि योग्य ती शिक्षा झाली पाहिजे असेही ते म्हणाले.