सध्याच्या राजकारणाला कंटाळून नवा पक्ष स्थापन करणार, अंजली दमानिया यांची घोषणा

एकेकाळी आप सारख्या पक्षाला कंटाळून त्यातून बाहेर पडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता नवा पक्ष स्थापण करणार अशी घोषणा केली आहे. महाराष्ट्राची निवडणूक संपली आहे. परंतू निकलानंतरची परिस्थिती काय आहे. पक्ष फोडणे, पैसे वाटणे हे सर्व पाहून सध्याचे राजकारण हाताबाहेर जात आहे. त्यासाठी एक पक्ष स्थापन करायचा निर्णय घेतला आहे. लवकरच पक्षाचे नाव आणि चिन्हं अशा गोष्टीचा निर्णय घेण्यात येईल असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

आम्हाला विधान सभेत मिरवायची हौस नाही. पक्षात इतकी वर्षे काम करणारी लोकं या पक्षातून त्या पक्षात जात असतील, तर आम्हाला महाराष्ट्राचे राजकारण सुधारायचं आहे. आज देशाला चांगल्या शिक्षणाची गरज आहे. आपण राजकीय पक्ष यासाठी काढत आहोत असे अंजली दमानिया यांनी सांगितले. राजकीय पार्टी बनविण्यासाठी आज आपण पहिली बैठक झाली आहे. यावेळी पक्षाची भूमिका मांडताना हा पक्ष शेतकऱ्यांचा, ऊस तोड कामगारांचा असणार आहे. तरुणांना बरोबर घेऊन सोशल मीडियाचा वापर करून तरुण लोकांना सोबत घेऊन आपला पक्ष सिद्धांतांवर राजकारण करेल असेही अंजली दमानिया यांनी यावेळी सांगितले.

आमचा पक्ष आदर्श असेल

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण काय आहे याचे व्हिजन आम्ही सर्व लोकांपुढे आणू , दरवेळी जातीचे कार्ड काढलं गेलं हा देश प्रगतीच्या मार्गांवर न्यायचा असेल तर रस्त्यात उतरताना आपण आधी भारतीय आहोत हे लक्षात घेतले पाहीजे. सध्या राजकीय पक्षांना चाप बसायला हवा. त्यांना आमच्या पक्षाकडून राजकारण कसे असते हे कळेल. देशाला पुढे नेणारे तळमळीचे लोक या पक्षात असतील असेही अंजली दमानिया यांनी सांगितले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)