छगन भुजबळ यांची ती खंतImage Credit source: टीव्ही 9 मराठी
मनी लॉडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) देशात लागू झाल्यापासून चर्चेत आहे. काँग्रेसच्या काळात हा कायदा आणण्यात आला होता. त्यातील एका तरतुदीने देशभरातली अनेक मातब्बर राजकारण्यांना मोठा फटका बसला. हा कायदा लागू करणारे माजी मंत्री पी. चिदंबरम यांना ही त्याचा फटका बसला. या कायद्याचा दुरुपयोग सत्ताधारी विरोधकांवर करत असल्याचा आरोप होत आहे. काल शरद पवार यांनी या कायद्यावर भाष्य केल्यानंतर छगन भुजबळ यांनी कायद्याचा जाच कसा झाला यावर मौन सोडले
पीएमएलएतील बदलाची ती कथा
राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी पवार यांच्या पाठोपाठ या कायद्यावर भाष्य केले. शरद पवार यांनी काल खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तक प्रकाशनाविषयी या कायद्यावर मोठे भाष्य केले होते. त्यातील महत्त्वाच्या तरतुदी कशा घातक ठरत आहे, यावर त्यांनी कटाक्ष टाकला. तर आज भुजबळांनी त्यावर मत मांडले.
2001 मध्ये अमेरिकेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांचे पैसे बँकेत गोठवल्या गेले पाहिजे. त्यांना लवकर जामीन मिळता कामा नये. त्यांच्यावर एकदम सक्त कारवाई व्हायला पाहिजे म्हणून जगामध्ये वेगवेगळे कायदे झाले. त्यावेळी भारतात ही कायदा करण्यात आले. पीएमएलए हा कायदा आणण्यात आला. त्यात विविध श्रेणी होत्या. दहशतवाद्यांसाठी A कायदा होता. भ्रष्टाचारासंबंधी B हा कायदा होतात. A मध्ये तुम्हाला जामीन मिळतच नव्हता तर B बी मध्ये तुम्हाला जामीन मिळत होता.
त्यावेळी चिदंबरम यांनी 2013 मध्ये E ही सुधारणा या कायद्यात आणली. A आणि B त्यावेळी एकच झाले. A तुम्हाला जामीन नाही त्याच्याप्रमाणे B मध्ये जामीन नाही. त्यावेळी बीजेपीचे नेते अरुण जेटली होते. ते मोठे वकील होते. त्यांनी त्यावेळी सांगितले हे तुम्ही करू नका. हे फार वाईट आहे. शरद पवार यांनी सुद्धा सांगितले पण चिदंबरम यांनी ऐकलेच नाही. आणि त्यांनी ते केले. कायद्यात बदल झाला. जामीन मिळण्यास अडचण आली.
मला पहिला फटका बसला
कायद्यातील या सुधारित तरतुदीचा पहिला फटका आपल्यालाच बसला असे छगन भुजबळ म्हणाले. या नवीन तरतुदींमुळे माझी अडीच वर्षे तुरुंगात गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्याविरोधात काहीच निघाले नाही, त्यामुळे मी सुटलो. आयुष्यातील अडीच वर्ष आणि किती मानसिक त्रास झाला, या आठवणीने भुजबळ स्तब्ध झाले.
चिदंबरम यांचा मुलगा कार्तिक, त्यानंतर स्वत: चिदंबरम यांना त्याचा फटका बसला. चिदंबरम या भिंतीवरून त्या दारावरून पाठी मागून उड्या मारतोय आणि पळतो हे सर्व आम्ही पाहीले ना. सर्व आपण करतोय ते योग्य आणि आपणच राहणार आहोत. तुम्ही जे करताना तुम्ही मोठे वकील स्वत:ला समजतात. भविष्यामध्ये त्याचा उपयोग किती दुरुपयोग किती याचे विचार करूनच कायदे करायला पाहिजे, असा टोलाही भुजबळांनी चिदंबरम यांना लगावला.
हे पाप चिदंबरम यांनी केले
कायद्या करता वेळी डोळ्यावर वेगळीच झाक आली होती. त्याचा भोग त्यांना भोगाव लागला. त्यानंतर त्याचा अनेकांना भोग भोगावा लागला. जामीन मिळवण्यासाठी अडखटी ती बसवली कोणी चिदंबरम यांनी ना- मारामार्या करणार्यांना जामीन मिळतो. खरे असेल तर दोषींना शिक्षा मिळते. सजा होते. चूक नसेल तर सुटतात. पण चिदंबरम अशी तरतूद केली की वर्ष, दोन वर्ष, चार वर्षे, पाच वर्ष जामीनच मिळाला नाही. हा कायदा बदलण्याचे पाप चिदंबरम यांनी केले, असा घणाघात भुजबळ यांनी घातला.