…अन् एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ कृतीनं अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलं, दिल्लीत नेमकं काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सदनात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू असताना एक घटना घडली, एकनाथ शिंदे यांनी आपल्या एका कृतीनं अख्ख्या महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत.

नेमंक काय घडलं? 

एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सनात या क्रार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं झालं.  शामिमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत गायलं. शामिमा अख्तर जेव्हा महाराष्ट्र गीत गात होत्या तेव्हा सर्वजण खालीच बसले होते. मात्र ही गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येताच ते स्वत: उभा राहिले अन् त्यांनी इतरांना देखील उभं राहिला सांगितलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)