सबका बदला लेगारे मैं! विजयानंतर गुलाबी जॅकेटवरून डिवचणाऱ्यांसाठी अजित पवारांचे त्यांच्या स्टाईलने उत्तर; ट्वीट खूपच चर्चेत

विधानसभा निवडणुकीत अद्यापपर्यंत तरी महाविकास आघाडीपेक्षा महायुती आघाडीवर आहे. या विजयानंतर अजित पवार यांनी आनंद व्यक्त करत ट्विट करत त्यांना गुलाबी जॅकेटवरून चिडवणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं आहे.

अजित पवारांवर गुलाबी जॅकेटवरून वारंवार विरोधकांची टीक 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जेव्हापासून गुलाबी जॅकेट घालण्यास सुरुवात केली तेव्हापासून एकनाथ शिंदेंपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांनीच अजित पवारांवर खोचक टीका केल्याचे पाहायला मिळाले. एवढच नाही तर विधानसभा निवडणुकांमध्येही गुलाबी रंगाच्या प्रचारावरून सतत टीका सहन करावी लागली.

विजयानंतर अजितदादांचे विरोधकांसाठी खास ट्वीट

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या लढाईत आज (शनिवार) निकालाच्या दिवशी सध्यातरी सुरवातीच्या कलानुसार भाजपप्रणित महायुती सत्ता स्थापनेजवळ गेल्याचे दिसत आहे.

निकालाचा कल पाहाता अजित पवारांनी आनंद साजरा करत विरोधकांसाठी एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी गुलाबी रंगाचा विजय झाल्याचे म्हटले आहे. ‘महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला’ असं लिहित त्यांना गुलाबी जॅकेटवरून चिडवणाऱ्या, ट्रोल करणाऱ्या सर्वांनाच सडेतोड उत्तर दिलं आहे.

तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोशल मिडीयाचे काम पाहणाऱ्या नरेश अरोरा यांचे गुलाबी फुले देतानाचा फोटो त्यांनी ट्विट केले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीवर

दरम्यान काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीची मोठी निराशा झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप सर्वांत मोठा पक्ष होत असल्याचे दिसत आहे, सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 100 चा आकडा पार केला आहे. सुरवातीच्या कलानुसार महायुती आघाडीवर आहे. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज सकाळीच प्रदेशाध्यक्ष सूनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जाऊन भेट घेतली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)