मुख्यमंत्रिपद आणि युगेंद्र यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; प्रीतीसंगमावर म्हणाले, माझी चूक झाली…

अजित पवार, नेते राष्ट्रवादीImage Credit source: ANI

आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 111 स्मृतिदिन आहे. या दिवसानिमित्त अजित पवार सध्या कराडमध्ये आहेत. कराडमधील प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचंही नाव चर्चेत आहे, याबाबत काही निर्णय झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते आम्ही तिन्ही पक्षाचे नेते बसू आणि निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झालेली आहे. सर्व अधिकार मला दिले. एकनाथ शिंदे यांची काल नेता म्हणून निवड केली आहे. आता भाजपने नेते निवड कुणाची करायची काय नाही ते ठरवेलं असेल. आम्ही तिघंही नंतर एकत्र बसू. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत, स्थिर सरकार देऊ, असं अजित पवार म्हणाले.

बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्ख पुतणे युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी विधानसभेला उमेदवारी दिली. यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. युगेंद्र हा धंदापाणी करणारा आहे. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. माझ्या सख्ख्या भावाच्या मुलालाच माझ्या विरोधात उमेदवारी दिली. माझ्या सख्ख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं. मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली, चूक झाली, चूक झाली… पण माझी चूक झाली म्हणजे घरातलाच माणूस उभाकरायचा काय?, असं अजित पवार म्हणालेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)